आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसईत स्थानिक कार्यकर्ता असलेल्या बिल्डरची गोळ्या घालून हत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वसईतील नायगावजवळ वडवली गावाजवळ काल रात्री शैलेश गजानन ठाकूर या बिल्डरची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. शैलेशचे सहकारी प्रकाश हंडोरी जखमी झाले आहेत.
शैलेश ठाकूर हे वसई-विरार सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते होते. ते वडवली गावाचे माजी सरपंच होते. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास शैलेश आपल्या प्रकाश हंडोरी या सहका-यासोबत वडवली गावाच्या ऑफिससमोर उभे होते. त्यावेळी एक मोटारसायकल आली. त्यावर दोन अज्ञात व्यक्ती होत्या. त्यांनी तेथे येताच अचानकपणे ठाकूर यांच्यावर तलवारीने हल्ला केला. त्यावेळी शैलेश यांच्या मानेवर, छातीवर वार करण्यात आले. प्रकाशवरही हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्यांनी शैलेश आणि प्रकाश यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात शैलेशचा जागीच मृत्यू झाला. तर, प्रकाश गंभीर जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत. व्यवसाय किंवा राजकीय वादातून सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याची शक्यता आहे.