आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यात पत्नीची विष पाजून हत्या करणार्‍या पतीला अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पत्नीला विषारी औषध पाजून पतीने ठार केल्याची घटना भिवंडी येथील कुंभारवाड्यात घडली. याप्रकरणी पती नारायण नारगे याला पोलिसांनी अटक केली आहे. नारायणचा पत्नी शांतीबाईशी क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. काही वेळानंतर त्याने पत्नीला कप भरून विषारी औषध पाजले. घटनेनंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला