आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उल्हासनगरमध्ये बारबालेची हत्या, प्रियकराला अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - उल्हासनगरमध्ये बारबालेची हत्या करणाऱ्या प्रियकराला कोलकात्यातून अटक करण्यात आली आहे. राजेश खान असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आशेळे गावात राहणाऱ्या जमिला खातून या महिलेशी राजेशचे प्रेमसंबंध होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणातून त्याने तिची गळा चिरून हत्या केली. जमिला बारमध्ये काम करत असल्याचे त्याला आवडत नव्हते. यामुळे दोघांत नेहमी भांडणे व्हायची. या वादातून दोघांत चार दिवसांपूर्वी कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे राजेशने तिची गळा चिरून हत्या केली. यासाठी त्याने आपल्या एक मित्राचीही मदत घेतली. त्यानंतर मृतदेह एका बॅगमध्ये भरून झुडपात फेकून दिला. घटनेनंतर राजेश कोलकत्याला पळून गेला.
बातम्या आणखी आहेत...