आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शीना बोरा हत्याकांडाचा तपास करणार्‍या पोलिस निरीक्षकाच्या पत्नीची हत्या, मुलगाही बेपत्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बहुचर्चित शिना बोरा हत्याकांडाचा तपास करणारे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पत्नी दीपाली यांची बुधवारी पहाटे चाकूचे वार करून हत्या करण्यात आली. त्यांचा मुलगाही मंगळवारपासून बेपत्ता आहे. ही माहिती स्वत: गणोरे यांनीच पोलिसांना दिली. गणोरे यांच्या मुलानेच ही हत्या केली असावी, अशी शंका घेतली जात आहे.  
 
दीपाली यांची बुधवारी भल्या पहाटे सांताक्रूझ परिसरातील जी. के. पार्क सोसायटीतील वकोला रेसिडेन्सीमध्ये हत्या करण्यात आली. रात्री ३ वाजता वकोला पोलिसांच्या मोबाइल व्हॅनला घटनेची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता दीपाली यांनी जखमी अवस्थेत आढळल्या. त्यांना तातडीने बी. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच त्यांचा मृत्यू झाला.

...कॅच अँड हँग !
गणोरे यांचा मुलगा बेपत्ता आहे. मुलानेच ही हत्या केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. मुलगा सिद्धांत बी. कॉम. प्रथम वर्षाला यंदा नापास झाला होता. घरातील फरशीवर ‘टायर्ड ऑफ हर, कॅच अँड हँग.....’ असे रक्ताने लिहिलेली ओळ पोलिसांना आढळली.
बातम्या आणखी आहेत...