आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदलापूर: शिवसेना उपशाखाप्रमुखांची अज्ञातांकडून हत्या, शहरात तणाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बदलापूर शहरातील शिवसेनेचे उपशाखाप्रमुख केशव मोहिते यांची अज्ञात मारेक-यांनी हत्या केली. बदलापूरमधील एमआयडीसी भागात आज सकाळी ही घटना घडली. दरम्यान, केशव मोहिते हे तेथील रिक्षा चालक संघटेनेचे पदाधिकारी म्हणूनही काम पाहत होते. त्यांची हत्या झाल्याचे समजताच बदलापूर शहरात बंद पुकारण्यात आला आहे. शहरातील सर्व रिक्षाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.
केशव मोहिते यांची हत्या कोणी केला याबाबत पोलिसांना अद्याप कोणतेही धागेदोरे हाती लागले नाहीत. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण आहे.