मुंबई -विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून सख्ख्या भावाने भावाची हत्या केल्याची घटना दादर येथे शुक्रवारी उघडकीस आली. जितुराज गोस्वामी असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी नवीनला अटक केली आहे. दोघेही भाऊ हे मूळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून ते बांद्रा येथे राहतात. नवीन हा आइस्क्रीम पार्लरवर मॅनेजर आहे. जितुराज याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. नवीनने त्याला अनेकदा समजावून सांगितले. मात्र, तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्यामुळे नवीनने महिलेच्या पतीला याबाबत माहिती दिली. त्यामुळे संतापलेल्या जितुराजने नवीनकडे जाब विचारला. या वेळी नवीनने त्याच्या पाठीत चाकू खुपसला.