आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX : शिवाजी महाराजांनाही जिंकता न आलेला हा जलदुर्ग, अद्याप अजिंक्‍य !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जलदुर्गांमध्ये प्रसिध्‍द असलेल्‍या किल्‍ल्‍यांपैकी रायगड जिल्ह्यातील ‘मुरुड-जंजिरा’ हा एक अभेद्य किल्ला आहे. जो रायगड जिल्ह्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्रामध्‍ये वसलेला आहे.
अरबी समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडच्यापुढे दंडा आणि राजपुरी समुद्रकिनारी असलेली गावे आहेत. राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर ‘मुरुड-जंजिरा’ हा किल्‍ला आहे. राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे.
‘जंजिरा’ नाव कसे पडले
जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरुड-जंजिराच्या तटावर 572 तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. शिवाजीच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला.
या किल्‍ल्‍याच्‍या निर्मितीसाठी 22 वर्षे लागली. तब्‍बल 22 एक्‍कर भागामध्‍ये हा किल्‍ला विस्‍तारलेला आहे. त्‍याच्‍यावर 22 सुरक्षा चौकी आहेत. ब्रिटिश, पोर्तुगीज आणि मराठी शासकांनी हा किल्‍ला जिंकण्‍याचा प्रयत्‍न केला परंतु हा किल्‍ला अजिंक्‍य राहिला आहे.
शिवाजी महाराजांनाही हा किल्‍ला जिंकता आला नाही
बुऱ्हाखानाने हा किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुऱ्हाणखानाने बांधलेले आहे. पुढे इ.स.1617 मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. सिद्दी अंबर हा जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष समजला जातो.या किल्ल्यातील सिद्दी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. शिवाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी य किल्ल्यानजीक पाच सहा कि.मी. अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता पण तरीही मुरुडचा जंजिरा जिंकणे महाराजांना शक्य होऊ शकले नाही .
पुढील स्‍लाइडवर वाचा, गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे आणि मुरुड जंजिरा किल्‍लाचे PHOTOS