आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Music Composer Ismail Darbar & His Son Arrested For Assault

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्रपट निर्मात्याला मारहाणप्रकरणी संगीतकार इस्माईल दरबारसह त्याच्या मुलाला अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- चित्रपटात केलेल्या कामाचे पैसे मागितले म्हणून संगीतकार इस्माईल दरबार व त्याच्या मुलाने आपल्या साथीदारांसह एका सहनिर्मात्याला मारहाण केली. प्रशांत चौधरी असे मारहाण झालेल्या सहनिर्मात्याचे नाव आहे. मारहाण केल्याप्रकरणी वरील सर्वांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबतची माहिती अशी की, सहनिर्माते असलेले प्रशांत चौधरी यांनी दरबार यांच्यासाठी काम केले होते. या कामाचे पैसे ब-याच दिवसांपासून दिलेले नव्हते. याबाबत चौधरी यांनी इस्माईल दरबार यांच्यासह मुलगा जैद याच्याकडे पैशाची मागणी केली. या मुद्द्यावरून दरबार यांच्या मुलाने प्रशांत धमकी दिली व तुला एकदा सांगितलेले कळत नाही का असे म्हणत मारहाण केली.
यावेळी जैद याच्यासह त्याचे सहकारी मित्र निशांत सिंह आणि मोहसीन खान यांनी चौधरी यांना जोरदार मारहाण केली. या वादात नंतर इस्माईल दरबार यांनीही उडी घेतली व प्रशांत चौधरींना धमकावले. यानंतर चौधरी यांनी अंबोली पोलिस ठाण्यात दरबार व त्याच्या मुलासह इतरांविरूद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे.