आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीतकार नंदू भेंडे यांचे निधन, मराठीतील पहिला रॉकस्टार हरपला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठीतील पहिले रॉकस्टार संगीतकार नंदू ऊर्फ सदानंद भेंडे यांचे आज सकाळी ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 61 वर्षाचे होते. ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे यांचे ते चिरंजीव होते.
नंदू भेंडे यांनी शास्त्रीय व सुगम संगीताच्या काळात अनेक प्रयोग केले. त्यामुळे 70 च्या दशकात त्यांनी एक प्रयोगशील संगीतकार म्हणून ओळख निर्माण केली. पुढे त्यांनी आपल्या संगीतात रॉक संगीताचा समावेश केला. मराठी गीतांना आज जो रॉकचा दर्जा प्राप्त झाला आहे तो निर्माण करण्यात भेंडे यांचे सर्वात वरचे काम होते. यानंतर भेंडे यांनी काही बॅंडसोबत काम केले. याचबरोबर अनेक सिनेमा, मालिकांसाठी संगीत देत पार्श्वगायन केले. इंग्लिश नाटकांची निर्मितीही त्यांनी केली.