आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muslim Candidate Discussing For Lesgislative Council

विधान परिषदेच्या जागेसाठी मुस्लिम उमेदवारांचीच चर्चा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधान परिषद सदस्य हुसेन दलवाई यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 14 फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार असून ही जागा मुस्लिम उमेदवाराला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसमधील उत्सुकांनी आपली नावे पुढे करण्यास सुरुवात केल्याचे समजते.

पण अद्याप काँग्रेसच्या नेत्यांकडून त्याबाबत चर्चा झालेली नाही. दलवाई यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर खासदार म्हणून जाणे पसंत केले. त्यामुळे त्यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. दलवाई यांच्या जागी दुस-या मुस्लिम उमेदवारालाच प्राधान्य द्यावे, असे काँग्रेसमधील एका गटाला वाटते. त्यामुळे मीरा-भाइंदरचे नेते मुझफ्फर हुसेन, विदर्भातील एस. क्यू. झामा यांची नावे चर्चेमध्ये आहेत. मात्र अद्याप प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री चव्हाण या जागेसाठी उमेदवार निश्चितीबाबत चर्चा केलेली नाही, असे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. पण इच्छुकांनी मात्र मोर्चेबांधणी सुरू केल्याचे समजते. या जागेसाठी 2016 म्हणजे साडेतीन वर्षांचा कालावधी उमेदवाराला मिळू शकेल.

4 फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असून येत्या दोन-चार दिवसांमध्ये पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले. शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी विधान परिषदेतील काही जागांच्या निवडणुकीबाबत न्यायालयात धाव घेतल्याने त्या जागेसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली नव्हती. न्यायालयाने परब यांची याचिका फेटाळल्याने या जागेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.