आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muslim Girl Wins Bhagavad Gita Contest In Mumbai

हिंदू स्पर्धकांना मागे टाकून मुस्लिम युवती भगवद‌्गीता स्पर्धेत आली प्रथम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या मरियम आसिफ सिद्दिकी या बारा वर्षांच्या विद्यार्थिनीने इस्कॉन इंटरनॅशनल सोसायटीतर्फे आयोजित भगवद‌्गीता स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. या परीक्षेला १९५ शाळांचे तब्बल ४५०० विद्यार्थी बसले होते.
मरियम ही मुंबईतील मीरा रोडच्या कॉस्मोपॉलिटन हायस्कूलमध्ये शिकत आहे. या स्पर्धेत मरियमने १०० पैकी १०० गुण मिळवले. भगवद‌्गीता वाचून मला जीवनाचे तत्त्वज्ञान मिळाले. मानवता हाच जगातील सर्वात मोठा धर्म असल्याचे मला त्यातून उमजले, असे मरियमने म्हटले आहे. या स्पर्धेतील सहभागासाठी पालकांनी तिला प्रोत्साहन दिले होते.
पुढील स्लाईडवर बघा, मरियम आसिफ सिद्दिकीच्या कुटुंबीयांचे फोटो....