आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिमांचा मताधिकार काढून घेण्याच्या शिवसेनेच्या मागणीवर विरोधकांची टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशातील मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात यावा अशी वादग्रस्त मागणी करणा-या शिवसेनेवर टीकेचे झोड उठली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी सामनात लेख लिहून अशी मागणी केली होती. दरम्यान, या मागणीनंतर विरोधी पक्षांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे.
भारतीय जनता पक्षानेही शिवसेनेच्या मतांशी असहमती दर्शवित संजय राऊत यांचे वक्तव्य घटनाविरोधी असल्याचे म्हटले आहे. भाजपच्या राष्ट्रीय व प्रदेश पातळीवरील नेत्यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. केंद्रीय मंत्री व्यंकया नायडू व प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी हे वक्तव्य घटनाविरोधी असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी राऊतांची री ओढली आहे. शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांनी आज खुलेआम राऊतांच्या वक्तव्याचे समर्थन केले. पक्षाच्या प्रवक्त्या निलम गो-हे यांनी रविवारी सावध प्रतिक्रिया दिली होती. मात्र सोमवारी शिवसेनेचे राऊतांच्या लेखांचे समर्थन केले.
भाजपने नाकारल्यानंतर काँग्रेससह इतर पक्षांनी या भूमिकेवरून शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी संजय राऊत यांना अटक करण्याची मागणी केली आहे. शिवसेना कोणत्या पद्धतीने काम करते हे संजय राऊतांच्या सामनातील लेखाने स्पष्ट झाले आहे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे.एमआयएमचे खासदार असाऊद्दीन ओवेसी यांनी शिवसेनेचा खरा चेहरा समोर आल्याचे म्हटले आहे तर देशाच्या घटनेने दिलेले अधिकार कोणीच काढून घेऊ शकत नाही असेही ओवेसींनी शिवसेनेला सुनावले आहे.
समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेने कोणतेही अवास्तव स्वप्ने पाहू नयेत असे आझमी यांनी म्हटले आहे. आरजेडी प्रमुख लालु प्रसाद यादव यांनीही शिवसेनेवर टीका करत अशा नेत्यांकडे दुर्लक्ष केले पाहिजे असा खोचक सल्ला दिला आहे.