आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मटरफ्लाय’मुळे आता सर्वांना घरचे जेवण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षयच्या (ऑरेंज टी-शर्ट) टीममध्ये ४ सदस्य आहेत. - Divya Marathi
अक्षयच्या (ऑरेंज टी-शर्ट) टीममध्ये ४ सदस्य आहेत.
मुंबई - मटरफ्लाय फुलपाखराप्रमाणे उडते. शेजाऱ्यांच्या स्वयंपाकघरात डोकावते. कोणत्या स्वयंपाकघरात काय तयार झाले याची माहिती खाण्याच्या शौकिनांपर्यंत माहिती देते. इच्छा असल्यास मागवून घ्या किंवा एकत्र येऊन आस्वाद घ्या. वाटले तर ज्याने रुचकर जेवण खाऊ घातले, त्याला काही रक्कम द्या किंवा मग त्याच्या आवडीचे रुचकर बनवून त्याला खाऊ घाला. यापैकी काहीही केले नाही तर, तुम्ही आनंदाने खाल्ले, पण त्याबदल्यात काही दिले नाही, हेही मटरफ्लाय सांगेल.

मटरफ्लाय हे मोबाइल अॅप आहे. फूड शेअरिंगसाठी. जे लोक घरापासून दूर एकटेच राहतात आणि ज्यांना नेहमीच घरच्या जेवणाची आठवण होते, त्यांच्यासाठी ते फायदेशीर आहे. त्याची चाचणी सुरू आहे. सुरुवातीलाच २०० लोक त्यात जोडले गेले आहेत. पुढच्या महिन्यात ते सर्वांसाठी उपलब्ध होईल. मुंबईतील अक्षयने मित्रांसोबत हे अॅप्लिकेशन तयार केले आहे. अक्षय लंडनमध्ये मॉर्गन स्टेनली कंपनीत लाखो रुपयांची नोकरी करतात. पण तेथे त्यांना रोज घरच्या जेवणाची आठवण होते. ते सांगतात, ‘माझे अनेक मित्र घरून जेवण आणतात. रोज म्हणत असत- ट्राय कर. पण त्यांच्या टिफिनमधून मी एक-दोन घासच घेऊ शकेन हे मला माहीत होते. त्यामुळे ते जेव्हा टिफिन उघडत असत तेव्हा मी कँटीनला जात असे. त्यामुळे मित्रांच्या डब्ब्यातील जेवण घ्यायचे, असे तेथेच निश्चित केले. तिथूनच ही कल्पना सुचली. मार्चमध्ये नोकरी सोडून मुंबईला आलो. सुरुवात स्वत:च्या इमारतीतूनच केली. पुढच्या रविवारी आपण एकत्र नाष्टा करू, असे पोस्टर एक दिवस कॉमन एरियात लावले. त्यात ७० कुटुंबे सहभागी झाली. नवे मित्रही मिळाले.’