आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘माय होम इंडिया’ने ३५ बेघर मुलांना बिहारमध्ये स्वगृही पाठवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कोणी उज्ज्वल भविष्याच्या अाशेने तर काेणी वाईट संगतीने घरदार साेडून मुंबईत अालेले. नंतर मात्र पश्चात्तापाची भावना मनात येते, मात्र परत जाण्याचे धाडस हाेत नाही. अशा ‘वाट चुकलेल्या’ मुलांना अापल्या घरी सुखरूप नेऊन साेडण्याचे काम मुंबईतील ‘माय हाेम इंडिया’ ही स्वयंसेवी संस्था करत अाहे. ‘सपनाे से अापने तक’ या प्रकल्पांतर्गत या संस्थेने सुमारे अडीच वर्षात सहाशेपेक्षा अधिक बालकांना त्यांच्या कुटुंबीयांची पुनर्भेट घडवून अाणली अाहे.
मुंबईच्या डोंगरी व मानखुर्द बालगृहातून साेमवारी अशीच ३५ मुले आपापल्या घरी परतण्यासाठी पाटण्याकडे रवाना झाली. यापैकी बहुतांशी मुले बालमजूर म्हणून बिहारमधून काेणी फसवून आणलेली अाहेत. तर काही निष्पाप मुले बालकामगार म्हणून काम करत असताना पाेलिसांनी साेडवलेली. माय होम इंडियाच्या पाच कार्यकर्त्यांसाेबत ४० पाेलिस कर्मचारी या मुलांना घेऊन वांद्रे- पाटणा एक्स्प्रेस गाडीने साेमवारी रवाना झाले. रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने या सर्वांसाठी रेल्वेगाडीत विशेष डब्याची साेय करण्यात अाली अाहे. माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर स्वत: या मुलांना टाटा करण्यासाठी स्थानकावर उपस्थित हाेते. प्रवासादरम्यान या सर्वांच्या खाण्या-पिण्याची साेय ‘माय होम इंडिया’च्या वलसाड, जबलपूर आणि सतना येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेली अाहे. सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे ३५ मुलांना स्वेटरची व्यवस्थाही करून देण्यात अाली अाहे. काही तासांतच ही मुले पुन्हा अापल्या अाईच्या कुशीत विसावतील.
बातम्या आणखी आहेत...