आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • My Salute To Feminist Secularist Trupti Desai Javed Akhtar ‏

मंदिर व दर्ग्यात भेदभाव न करणा-या तृप्ती देसाईंना माझा सलाम- जावेद अख्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जावेद अख्तर - Divya Marathi
जावेद अख्तर
मुंबई- हिंदू धर्मातील महिलांना शनिशिंगणापूर आणि त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात प्रवेश मिळवून दिल्यानंतर मुस्लिम धर्मातील महिलांना हाजी अली दर्ग्यातील मजारापर्यंत प्रवेश मिळवून देण्यासाठी गुरुवारी मुंबईत आंदोलन करणा-या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना ज्येष्ठ गीतकार, लेखक जावेद अख्तर यांनी सलाम ठोकला आहे. जावेद अख्तर यांनी आज सकाळी टि्वट करून तृप्ती देसाईंना माझा सलाम असे म्हटले आहे. तृप्ती देसाई यांच्याविरोधात भेदभाव झाला असला तरी त्यांनी समतेच्या लढाईत मंदिर आणि दर्गा यांच्यात फरक केला नाही अशी कौतूकाची थाप तृप्ती देसाईंना दिली आहे.
मुस्लिम महिलांचा तृप्ती देसाईंना पाठिंबा-
दरम्यान, कोणताही धर्म महिलांना असमानता शिकवत नाही असे सांगत महिलांनाही दर्ग्यात सर्वत्र प्रवेश मिळाला पाहिजे अशी भूमिका मुस्लिम महिलांनी घेतली आहे. हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळविण्यासाठी यापुढे आंदोलन करू व तृप्ती देसाईंना साथ देऊ अशीही भूमिका मुस्लिम महिलांनी घेतली आहे.
सलीम खानसह सुपरस्टार खानमंडळींची आळीमीळी गुपचीळी-
- तृप्ती देसाई यांनी बॉलिवुडमधील तीन सुपरस्टार्स खान मंडळी सलमान, अमिर आणि शाहरूख यांना हाजी अली दर्ग्यात मुस्लिम महिलांना प्रवेश मिळत नसल्याबाबत आपली भूमिका मांडण्याचे आवाहन केले आहे.
- हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश बंदी आहे याबाबत सलमान, शाहरुख आणि आमिर खानला काय वाटते व त्यांचे काय म्हणणे आहे याचा खूप परिणाम होऊ शकतो.
- हे तीन खान देशात लोकप्रिय आहेत त्यांची फॅन फॉलोइंग खूप आहेत. जर त्यांनी आपली भूमिका मांडली तर त्याचा मुस्लिम समाजात खूप मोठा व सकारात्मक प्रभाव पडेल.
- त्यामुळे मी या तीन सुपरस्टार खान मंडळींना आवाहन करते की, त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया द्यावी. या प्रकारामुळे तृप्ती देसाई यांनी खान मंडळींवर नैतिक दबाव आणला.
- मात्र, या तीन खान मंडळींनी सध्या तरी आळीमीळी गुपचीळी असेच धोरण ठेवले आहे.
- दुसरीकडे, जावेद अख्तर यांच्यासमवेत अनेक वर्षे काम केलेले व विविध सामाजिक मुद्यांवर भाष्य करणारे संवाद, पटकथा लेखक सलीम खान यांनीही या विषयावर सोईस्कररित्या चुप्पी साधली आहे.
पुढे पाहा, जावेद अख्तर यांनी केलेले टि्वट...