आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • My Statement Read Not Meaningful Manner, Munde Say

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘त्या’ वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला, मुंडेंचा निवडणूक आयोगाकडे लेखी उत्तर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला आठ कोटींचा खर्च करावा लागल्याचे जाहीर वक्तव्य करून वादात अडकलेले भाजप उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगाने पाठलेल्या नोटिशीला लेखी उत्तर दिले. ‘माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मी केवळ निवडणुका महाग झाल्याने यात काळ्या पैशांचा वापर होतो’, असे वक्तव्य केले होते. मात्र, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे मुंडे यांनी उत्तरात सांगितले. आयोगाने नोटीस पाठवल्यानंतर आयकर विभागानेही 8 कोटींच्या उत्पन्नाचे विवरण सादर करण्यासाठी मुंडे यांना नोटीस पाठवली होती. मुंबईत नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात उर्त्स्फूतपणे बोलताना मुंडे यांनी लोकसभा निवडणूक कशी महाग होत चालली आहे, याचे वर्णन केले होते. ओघातच त्यांनी स्वत:च्या खर्चाचा ताळेबंद जाहीरपणे सांगितला होता.