आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर पंचायतींमध्ये भाजप-सेनेचे वर्चस्व, राणेंनी मात्र राखली कुडाळची सत्ता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील नवनिर्मित सहा नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल साेमवारी जाहीर झाले. त्यापैकी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीला प्रत्येकी एका ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळाले अाहे, तर दाेन ठिकाणी भाजप पुरस्कृत स्थानिक अाघाडी व एका ठिकाणी भाजपच्या मदतीने शिवसेनेला सत्ता मिळण्याची चिन्हे अाहेत, तर महापालिकांच्या पाेटनिवडणुकीतही शिवसेनेने तीन व भाजपने दाेन जागा पटकावल्या अाहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगर पंचायत निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचे वर्चस्व राहिले. एकूण १७ जागांपैकी नऊ जागा पटकावत कांॅग्रेसने सत्ता मिळवली. तर शिवसेनेला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले. साेलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगर पंचायतीत शिवसेनेने बाजी मारली आहे. शिवसेनेला सहा तर भाजपला दाेन जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीला चार जागांवर यश मिळवता आले. मोहोळमध्ये राष्ट्रवादीचे नेते राजन पाटील यांचे मोठे वर्चस्व आहे. मात्र, नगर पंचायत निवडणुकीत मतदारांनी या पक्षाला धक्का दिला आहे. याच जिल्ह्यातील माढा नगर पंचायत निवडणुकीतही राष्ट्रवादीला धोबीपछाड मिळाला. आमदार बबन शिंदे आणि त्यांचे पुतणे संजय शिंदे यांचा निभाव दादासाहेब साठे गटापुढे लागला नाही. साठे यांच्या गटाला भाजपने पाठिंबा दिला होता. तर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढली होती. १७ जागांपैकी भाजप पुरस्कृत साठे गटाला १२ जागांवर यश मिळाले तर राष्ट्रवादीला ४ तर काँग्रेसला १ जागा मिळाली. माळशिरस नगर पंचायत मात्र त्रिशंकू अवस्थेत राहिली. भाजप पुरस्कृत संजीवनी पाटील यांच्या गटाला ५ तर तुकाराम देशमुख यांच्याही गटाला ५ जागा मिळाल्या. राष्ट्रवादीच्या मिलिंद कुलकर्णी गटाला ४ जागा, माणिक वाघमोडे गटाला २ जागा तर अपक्षाला एक जागा मिळाली. माळशिरस येथील नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. संजीवनी पाटलांच्या गटाचे अनुसूचित जातीचे सर्व तीनही उमेदवार निवडून आल्याने सत्ता पाटील गटाकडेच जाणार हे उघड अाहे. फक्त अाता त्यांना मदत काेण करताे याची उत्सुकता अाहे.

उस्मानाबादमधील लोहारा नगर पंचायत शिवसेनेच्या ताब्यात राहिली. शिवसेनेने १७ पैकी ९ जागांवर विजय मिळवला आहे तर राष्ट्रवादीला ४, काँग्रेसला ३ आणि अपक्षाला एका जागेवर यश मिळाले. सातारा जिल्ह्यातील लोणंद नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने अाठ जागा खेचून आणल्या आहेत. काँग्रेसला ४ जागा मिळाल्या आहेत. भाजपला दाेन, तर अपक्षाला १ जागा मिळाली आहे.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मोहोळमध्ये शिवसेनेची बाजी
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणा-या मोहोळ नगरपंचायतीत शिवसेनेने बाजी मारली आहे. शिवसेनेला 6 तर भाजपला 2 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीला 4 जागांवर यश मिळवता आले. मोहोळमध्ये राष्ट्रवादीचे नेते राजन पाटील यांचे मोठे वर्चस्व आहे. मात्र, नगरपंचायत निवडणुकीत नागरिकांनी धक्का दिला आहे.
माढ्यात साठे गटाची एकतर्फी बाजी
माढा नगरपंचायत निवडणुकीतही राष्ट्रवादीला धोबीपछाड मिळाला. आमदार बबन शिंदे आणि त्यांचे पुतणे संजय शिंदे यांचा निभाव साठे गटापुढे लागला नाही. दादासाहेब साठे यांच्या गटाला भाजपने पाठिंबा दिला होता. तर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढली होती. 17 जागांपैकी भाजप पुरस्कृत साठे गटाला 11 जागांवर यश मिळाले तर राष्ट्रवादीला 4 तर काँग्रेस व अपक्षांना प्रत्येकी 1 जागा मिळाली.
शिवसेना-भाजप पालिकेतही वरचढ
राज्यातील सहा महापालिकांतील पाेटनिवडणुकीतही नऊपैकी शिवसेनेने तीन, तर भाजप व काॅंग्रेसने प्रत्येकी दाेन जागा पटकावल्या अाहेत. अाैरंगाबादेतील दाेन वाॅर्डांत अनुक्रमे भाजप व कांॅग्रसने प्रत्येकी एक जागा पटकावली. कल्याण- डाेंबिवलीतही भाजप- शिवसेनेने प्रत्येकी एक जागा जिंकली. पिंपरी- चिंचवड व अहमदनगर महापालिकेत शिवसेनेही एक-एक जागा पटकावली. सांगलीत कांॅग्रेस, नवी मुंबईत राष्ट्रवादी तर ठाण्यातील जागा अपक्षाने जिंकली.
माळशिरसमध्ये संजीवनी पाटील गटाकडे सत्ता-
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगर पंचायतीत 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत त्रिशंकू अवस्था पाहायला मिळाली. भाजप पुरस्कृत संजीवनी पाटील यांच्या गटाला 5 तर तुकाराम देशमुख यांच्याही गटाला 5 जागा मिळाल्या. राष्ट्रवादीच्या मिलिंद कुलकर्णी गटाला 4 जागा मिळाल्या. तर माणिक वाघमोडे गटाला 2 तर अपक्ष मारूती पाटील यांनी विजय खेचून आणला. जुनेजानते व भाजपचे माजी नेते सुभाष पाटील यांनी संजीवनी पाटील गटाचा उघड प्रचार केला होता. त्यामुळे सुभाष पाटील यांना मानणा-यांचा हा विजय असल्याचे दिसून येते. माळशिरस येथील नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. संजीवनी पाटलांच्या गटाचे अनुसूचित जातीचे सर्व तीनही उमेदवार निवडून आल्याने पाटील गटाकडे सत्ता राहणार हे उघड आहे. संजीवनी पाटील यांना मिलिंद कुलकर्णी व अपक्ष मारूती पाटील साथ देण्याची शक्यता आहे.
उस्मानाबादमधील लोहारा नगर पंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेने 17 पैकी 9 जागांवर विजय मिळवला आहे तर राष्ट्रवादीला 4, काँग्रेसला 3 आणि अपक्षाला एका जागेवर यश मिळाले.
सातारा जिल्ह्यातील लोणंद नगर पंचायत निवडणूकीत राष्ट्रवादीने 8 जागा खेचून आणल्या आहेत. काँग्रेसला 4 जागा मिळाल्या आहेत. भाजपला 2, तर अपक्षला 1 जागा मिळाली आहे.