आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : ट्रकच्‍या धडकेत एक ठार तर एक गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, तर एक गंभीर जखमी झाला आहे. अहमदपूर तालुक्यातील तोलगाव पाटी येथे शनिवारी हा अपघात झाला. या प्रकरणी अहमदपूर पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तेलगाव पाटी येथे रस्त्याच्या कडेला जहूर छोटूसाब शेख हे त्यांची मोटारसायकल (क्रमांक एमएच २४ एल ३२३४ )थांबवून त्यांचा मित्र बळीराम विठ्ठल मोरे यांच्याशी बोलत होते. दरम्यान, भरधाव वेगात येणारा ट्रकने (एमएच १६ ए ७२ ११) दोन्ही दुचाकीस्वारांना धडक दिली. यात जहूर शेख जागीच ठार झाले, तर बळीराम मोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दिवसभरातील ताज्‍या बातम्‍या वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा