आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagpur Winter Session, Congress Aggresive Over Drought & Farmers Issue

दुष्काळप्रश्नी विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा, विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादीतच फूट!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. विदर्भ, मराठवाड्यात 80 टक्क्यांपेक्षा जास्त गावात भीषण स्थिती आहे. राज्यातील उर्वरित भागातही शेतक-यांच्या समस्या आहेत. अशी सगळी प्रतिकूल स्थिती असताना केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार याप्रश्नी गंभीर नाही. त्यामुळे सरकारच्या विरोधात हजारो शेतक-यांसह काँग्रेस पक्षाने विधान भवनावर आज सकाळी 11 वाजता भव्य मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्त्व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले.
यावेळी ठाकरे म्हणाले, दुष्काळी भागातील कोरडवाहू शेतक-यांना 25 हजार रूपये तर, बागायतदारांना हेक्टरी 50 हजार रूपयांचे पॅकेज द्यावे. भाजपने विरोधात असताना शेतक-यांना खूप आश्वासन दिली होती. आता केंद्रात आणि राज्यातही भाजपची सत्ता असताना त्यांच्या नेत्यांना आश्वासनाचा विसर पडलेला आहबे. भाजपने शेतक-यांना खोटी आश्वासने दिली आहेत हे सिद्ध होत आहे असे सांगत ठाकरे यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. यावेळी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.
विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादीत पहिल्या तासापासूनच फूट- दुष्काळ, शेतकरी आत्महत्या आदी संवेदशनील मुद्यांमुळे नागपूरमधील हिवाळी अधिवेशन गाजेल अशी चिन्हे असतानाच आता विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादीतच फूट पडल्याचे दिसून येत आहे. आज सकाळी अधिवेशनाचे काम सुरु होताच काँग्रेसने दुष्काळ व शेतक-यांच्या आत्महत्यांबाबत सभागृहात चर्चा करावी अशी मागणी काँग्रेसने केली. मात्र, काँग्रेसच्या मागणीला राष्ट्रवादीने विरोध केला. विषयपत्रिकेवरील कार्यक्रमानुसारच कामकाज झाले पाहिजे असे सांगत राष्ट्रवादीने काँग्रेस पक्षाला विरोध केला. दरम्यान, विरोधकांत फूट पडल्याने भाजप सरकारला कडवा विरोध सहन करावा लागणार नाही. फडणवीस सरकारला विरोधाच्या तीव्रतेच्या धार कमी होणार आहे.
कोकण सागरी किनारी मार्गाला अंतुलेंचे नाव द्या- कोकण सागरी किना-यावरील मार्गाला माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे नाव द्यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज विधान परिषदेत केली. अंतुले यांचे मागील आठवड्यात निधन झाले आहे. त्यामुळे तटकरे यांचे राजकीय गुरु राहिलेल्या अंतुलेंचे नाव कोकण सागरी किना-याला देण्याची मागणी त्यांनी केली आहे.