आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अतिरेकी भटकळशी नकीचा ‘फेसबुक’वरून संपर्क: मुंबई एटीएसचा दावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेला नकी अहेमद फेसबुकच्या माध्यमातून इंडियन मुजाहिदीनचा अतिरेकी यासीन भटकळशी संपर्कात होता. दहशतवादविरोधी पथकाने रविवारी हा दावा केला आहे. नकी अहमद हा आपला खब-या असल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा आहे.
मुंबईत मागील वर्षी 13/7ला झालेल्या बॉम्बस्फोटांच्या आरोपात नकीला पकडण्यात आले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारावर सीम कार्ड खरेदी करण्याच्या आरोपाखाली 10 जानेवारी 2012 रोजी त्याला अटक करण्यात आली होती. एटीएसच्या म्हणण्यानुसार नकीमार्फत खरेदी करण्यात आलेले सीमकार्ड अतिरेक्यांनी वापरले आहेत. दादर, जव्हेरी बाजार आणि आॅपेरा हाऊसमधील साखळी बॉम्बस्फोट याच लोकांनी केले, असाही एटीएसचा दावा आहे. या स्फोटांत 27 जणांचा बळी गेला, तर 127 जण जखमी झाले होते.एटीएसच्या अधिकाºयांनी सांगितले की, 2008 मध्ये नकी फेसबुकवरून इम्रानशी संपर्कात होता. हा इम्रान म्हणजेच यासीन भटकळ आहे. नकीशिवाय नदीम आणि वकासदेखील फेसबुकच्या माध्यमातून परस्परांशी संपर्कात होते. सांकेतिक भाषेत ते एकमेकांशी बोलत होते. खातरजमा करून घेण्यासाठी त्यांच्या फेसबुक अकाऊंटच्या प्रिंट आऊटही घेण्यात आल्याचे अधिका-यांनी सांगितले. एटीएसने आतापर्यंत नकी, नदीम शेख, कंवर पथरीजा हारून नाईक आणि मोहंमद कफील अन्सारी या पाच जणांना अटक केली आहे.