आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नमाज हा योगाचाच एक प्रकार- एकनाथ खडसेंचे खळबळजनक वक्तव्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुस्लिमधर्मिय लोक जो नमाज पढतात तो एक योगचाच प्रकार आहे. हा योगा करताना सुर्याला नमस्कार करण्याऐवजी अल्लाला केला तर काहीही हरकत नाही, असे खळबळजनक वक्तव्य अल्पसंख्याक खात्याचे मंत्री एकनाथ खडसे यांनी केले आहे. आम्ही सरकार म्हणून काम करताना कोणावरही कसलीही धार्मिक सक्ती करीत नाही, असेही खडसेंनी स्पष्ट केले.
येत्या 21 जून रोजी जगभर भारताच्या खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकारानंतर आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात येणार आहे. यात जगभरातील 192 देश हा दिवस साजरा करणार असून, यात कोट्यावधी लोक सहभागी होणार आहेत. यासाठी भारतातही खास तयारी सुरु आहे. देशभरातील शालेय मुलांना 21 जून रोजी रविवारची सुट्टी असूनही कार्यक्रमात सहभागी होण्याचे आदेश भाजपशासित राज्यांनी काढले आहेत. मात्र, याला एमआयएम या मुस्लिम पक्षाने विरोध केला आहे.
शाळेत योग दिन आयोजित करण्याला मुस्लिम धर्मियांनी आक्षेप घेताना म्हटले आहे की, इस्लाम धर्मियात रमजानचा महिना सुरु असताना कोणालाही सुर्यनमस्कार घालता येत नाही. त्यामुळे आम्ही योग दिनाला विरोध करीत आहोत. याप्रकरणी गदारोळ झाल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी योग दिनासाठी सक्ती करण्यात आलेली नाही असे सांगत ज्यांना स्वेच्छेने सहभागी व्हायचे आहे त्यांच्यासाठीच हा कार्यक्रम असेल असे जाहीर केले.
याबाबत अल्पसंख्याक खात्याची जबाबदारी असलेल्या खडसेंना पत्रकारांनी छेडले असता त्यांनी 'नमाज आणि योग' हा एकच प्रकार असल्याचे म्हटले आहे. मात्र, एमआयएमसारखे पक्ष धर्माच्या नावाखाली मुस्लिम बांधवाना भडकावत आहेत व आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत. मात्र, एमआयएमसारख्या छोट्या घटकांना याबाबत फारसे महत्त्व देण्याची गरज नाही अशी टोलेबाजीही खडसे यांनी केली. पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तातही योग दिनाचा कार्यक्रम साजरा होणार असल्याकडे खडसेंनी लक्ष वेधले.