आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Namdeo Dhasal Tqlk On Marathwada University Namantar Issue

मराठवाडा विद्यापीठाने नामांतर इतिहासावर बोळा फिरवला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठवाडा विद्यापीठाचा नामांतर लढा हे आंबेडकरांच्या पाईकांची सर्वश्रेष्ठ लढाई होती. या विद्यापीठाचे नाव बदलले, पण विद्यापीठातील शिक्षण मात्र जातीयवादीच राहिले, असा आरोप दलित पँथरचे संस्थापक, कवी नामदेव ढसाळ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

मराठवाडा विद्यापीठ बाबासाहेबांची जाती अंताची चळवळ पुढे चालवेल, असे वाटले होते, परंतु बाबासाहेबांचे नाव असणार्‍या याच विद्यापीठात जातीची सर्वाधिक चलती आहे. स्वत: कर्मठ परंपरेत गुरफटलेले विद्यापीठ चळवळीला दिशा देईल, अशी अपेक्षा व्यर्थ आहे. आजच्या दलित मध्यवर्गीयांनी सामाजिक आच पूर्णपणे सोडून दिली असून तो स्वकेंद्रित झाला आहे, त्यामुळेच आजची आंबेडकरवादी चळवळ गलीतगात्र झाली आहे. सध्याच्या भांडवली लोकशाहीचे रूपांतर सामाजिक लोकशाहीत केल्याशिवाय दलितांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी बिगर अस्पृश्येतरांच्या सद्सद्विवेक बुद्धीला हात घालून लढ्यात उतरवावे लागेल .रालोआच्या स्थापनेबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील समर्पण वृत्ती संपली असून दलितांच्या संघटना तर रागालोभाने पोखरल्या आहेत. सर्वजण प्रकाशमान व्हा, असा बाबासाहेबांनी संदेश दिला होता. मात्र आमचा एक आंबेडकरवादी दुसर्‍या आंबेडकवाद्याला नेहमी जाळण्यात धन्यता मानतो, अशी टीका ढसाळ यांनी केली.

मंगळवारी वर्धापनदिन
9 जुलै रोजी दलित पँथर 41 वा वर्धापनदिन साजरा करत आहे. मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात होणार्‍या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार आणि ‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर असतील अशी माहिती ढसाळ यांनी दिली.