आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद राव फाइव्हस्टार युनियन चालवतात; नामदेव ढसाळांची टीका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘म्युनिसिपल कामगार संघटना’ ही बाबासाहेबांच्या काळात कार्यरत झालेली पहिली युनियन होती. मात्र, शरद राव फाइव्हस्टार पद्धतीने सफाई कामगारांची युनियन चालवतात आणि कामगार पुढारी म्हणून त्यांच्या मिजाशीला आम्ही शरण जातोय, अशी टीका ज्येष्ठ विचारवंत नामदेव ढसाळ यांनी बुधवारी केली.

‘सफाई कामगारांचे आयुष्य’ या विषयांवर सुधाकर ओलवे यांनी काढलेल्या छायचित्रांच्या पुस्तकांचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. ढसाळ म्हणाले, सफाई कामगारांच्या विषयावर ओलवे यांनी चिरवेदनेवर बोट ठेवले आहे.

या पुस्तकात छायाचित्रांसोबतच दोन ओळी लिहिल्या गेल्या असत्या तर नवख्या वाचकाला त्यातील वास्तव अधिक कळले असते, असा वडिलकीचा सल्लाही त्यांनी ओलवे यांना दिला.