आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना पाटेकरचा भाऊ होता अंडरवर्ल्‍ड डॉन, घाबरायचा दाऊद, झाले एन्‍काउंटर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेते नाना पाटेकर यांच्‍या आईचे माहेरचे आडनाव सुर्वे. रमण सुर्वे हा त्‍यांचा सख्खा धाकटा मामा. मुंबईतील कुख्‍यात गुंड मन्या सुर्वे हा त्‍यांचा मामेभाऊ. नानांवर त्याचे सावट पडू नये म्हणून लहानपणीच त्‍यांच्‍या आईने त्‍यांना मुंबईतून मुरूड-जंजिर्‍यास राहण्यास नेले. शुक्रवार, 1 जानेवारीला नानांचा वाढदिवस. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे मन्‍या सुर्वे आणि नानांबद्दल रंजक माहिती...
मन्या कसा झाला गँगस्टार ?
मनोहर ऊर्फ मन्‍या सुर्वे हा मुंबईतील कुप्रसिद्ध डॉन होता. त्‍याच्‍या आयुष्‍यावर 'शुट आऊट अॅट वडाळा' हा हिंदी चित्रपटही आला. मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्‍याचा जन्‍म झाला. कीर्ती कॉलेजमधून त्याने बीए केले. मात्र, आपला सावत्र भाऊ भार्गवमुळे तो गुन्‍हेगारी जगतात आला. त्‍याने त्याच्या कॉलेजमधील मित्रांनाही गँगमध्ये सामिल करून घेतले. भार्गवची मुंबईतील दादरमध्ये मोठी दहशत होती.
कसा केला पहिला खून ?
मन्याने पहिला खून केला तो 1969 मध्ये दांडेकर नावाच्या व्यक्तीचा. या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आणि पुण्याच्या येरवडा तुरुंगात रवानगी झाली होती. तेथून त्‍याने पळ काढला. पुढे पोलिसांच्‍या एन्‍काउंटरमध्‍ये तो ठार झाला.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, लहापणीच नाना गेले होते वेश्‍येकडे ... मन्‍या, भार्गव आणि नानांचे कसे होते संबंध... मन्‍याला घाबरायचा दाऊद...