आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का देता; नाना पाटेकरांचा सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेते नाना पाटेकर. - Divya Marathi
अभिनेते नाना पाटेकर.
मुंबई- भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का देता, असा सवाल नाना पाटेकर यांनी उपस्थित केला. मुंबईतल्या प्रसिद्ध व्हीजेटीआय इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात नाना पाटेकरांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. त्यावेळी त्यांनी हा सवाल उपस्थित केला. 
 
फेरीवाल्यांची चूक काय?
नाना म्हणाले, “मला वाटतं फेरीवाल्यांची यात काहीच चूक नाही. फेरीवाले आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी दोन वेळच्या भाकरीसाठी ते काम करणारच. आपण त्यांची भाकरी हिरावून घेऊ शकत नाही. यामध्ये खरंतर आपली चूक आहे, आपण महापालिकेला, प्रशासनाला इतके दिवस फेरीवाल्यांना जागा का दिली नाही? याबाबत का विचारलं नाही? म्हणजे याला आपणच जबाबदार आहोत. फेरीवाले नाही”. कर्जमाफीबाबत बोलताना नाना म्हणाले, कर्जमाफी ही कधीच शेतकऱ्यांसाठी पर्याय असू शकत नाही. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळायला हवा. त्यामुळे जोपर्यंत हमीभाव येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे काहीही होणार नाही. 
 
आपल्यापुरते जगणे सोडा
नाना म्हणाले, आपण आपल्यापुरते जगणे आता सोडायला हवे. आयुष्यात तुम्ही एका तरी माणसाला वाचायचे ठरवा. जीवनात एकच क्षेत्र असं आहे ज्यामध्ये  स्पर्धा नाही ते म्हणजे दातृत्व हे होय. लोकांसाठीच आपल्याला काम केलं पाहिजे, असा विचार  राजकारणात येण्यामागे असावा, मात्र आताचे राजकारणी हा विचार कुठे करतात, असा सवाल नानांनी उपस्थित केला. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...