आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अॅट्राॅसिटी’च्या दुरुस्तीवेळी मराठा खासदारांचे तोंड बंद, नाना पटाेले यांची पवारांसह नेत्यांवर टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘अॅट्रासिटीकायद्यात सुधारणा करण्याच्या मराठा समाजाच्या मागणीला आज मराठा समाजाचे खासदार पाठिंबा देत असले तरी प्रत्यक्षात गेल्यावर्षी या कायद्यातील दुरूस्त्या संसदेत चर्चेला आल्या तेव्हा या खासदारांपैकी कुणीही ही मागणी केली नाही. या कायद्यांतर्गत खोटे खटले दाखल करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, या माझ्या मागणीचे समर्थनही एकाही मराठा खासदाराने केले नाही’, अशी टीका भाजपचे खासदार नाना पटोले यांनी केली. मंत्रालयात सोमवारी अायाेजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“लोकसभेत चार ऑगस्ट २०१५ रोजी अॅट्रासिटी कायद्याच्या दुरूस्तीबाबत चर्चा झाली. त्यानंतर ती राज्यसभेतही झाली. या दुरूस्तीद्वारे हा कायदा अधिक कठोर करण्यात आला आणि पीडितांना सरकारतर्फे मिळणारी मदत वाढविण्यात आली. यावेळेस मी या कायद्यातंर्गत खोटी तक्रार करणाऱ्यांना शिक्षा देण्याची तरतूद करण्याची आग्रही मागणी लावून धरली. मात्र आज कायद्यात दुरूस्ती करण्याचे मागणी करणारे मराठा समाजाचे खासदार आणि राज्यसभेतील ‘जाणते राजे’ यांनी त्यावेळेस तोंडही उघडले नाही,’ अशा शब्दात पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अन्य खासदारांवर टीका केली. अॅट्रासिटी कायद्यांतर्गत किमान ९५ टक्के खोटे खटले दाखल होतात, अशी केंद्रीय गृहमंत्रालयाची आकडेवारी सांगते. त्यामुळे खोटे खटले दाखल करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी आणि तशी दुरूस्ती या कायद्यात केली जावी, अशी मागणीही पटोले यांनी केली.

‘फडणवीस सरकारला ओबीसींची काळजी नाही’
‘राज्यात ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी आपण अनेकदा केली. आजवर दोनदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा मंत्रालय स्थापनेची घोषणाही केली. मात्र आजवर ही घोषणा वास्तवात उतरली नाही. ओबीसींच्या फ्रीशिपसाठीची मर्यादा सहा लाख करायला आमच्याच सरकारला दोन वर्ष लागले. त्यामुळे आमच्या सरकारला तरी ओबीसींची चिंता आहे का?,’ अशा शब्दात पटोले यांनी अापल्याच पक्षाच्या सरकारला ‘घरचा आहेर’ दिला.
बातम्या आणखी आहेत...