आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेतृत्वावर टीका करत आधी काँग्रेस, आता भाजप सोडला; नाना पटोले यांचा राजीनामा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या ध्येयधोरणांवर नाराजी व्यक्त करून जाहीर टीका करणारे भाजपचे भंडारा-गोंिदयाचे खासदार नाना पटोले यांनी अखेर शुक्रवारी खासदारकी व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. २००९मध्ये राज्यातील तत्कालीन काँग्रेस नेतृत्वावर अशीच टीका करत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नाआडून टीका करत त्यांनी भाजपला रामराम ठोकला. केंद्रात मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले पटोले यांनी “राज्य सरकारने शेतकऱ्यांचा आणि जनतेचा विश्वासघात केला आहे’, असे सांगत पक्ष सोडताच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी त्यांची भेट घेऊन गोपनीय चर्चा केली. मात्र, कोणत्या पक्षात प्रवेश करायचा याचा निर्णय अद्याप घेतला नसल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.


भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवसांपूर्वी अकाेल्यात झालेल्या सरकारविराेधी  शेतकरी अांदाेलनात पटाेले सहभागी झाले हाेते. मुख्यमंत्र्यांच्या अाश्वासनानंतर बुधवारी हे अांदाेलन मागे घेण्यात अाले. त्यानंतर दाेनच दिवसांनी शुक्रवारी सकाळी पटाेले यांनी राजधानी दिल्लीत लाेकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या कार्यालयात खासदारकीचा राजीनामा सादर दिला. पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी भाजपच्या नेत्यांकडे पाठवून दिला आहे. शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन पटाेले यांनी राजीनामा देण्यामागची भूमिका स्पष्ट केली. ‘देशातील सरकार शेतकऱ्यांच्या अडचणी साेडवण्यात अपयशी ठरले अाहे. मी इथे खुर्च्या उबवायला आलो नाही. जनतेची कामेच होत नसतील तर पदावर राहण्यात काय अर्थ? सरकार एेकत नसेल तर साेबत राहून काम करण्यात काय अर्थ अाहे? त्यापेक्षा पुन्हा जनतेत जाऊन काम केले पाहिजे, असे मला वाटले म्हणून मी राजीनामा दिला,’ असे त्यांनी स्पष्ट केले.   सरकार अापले असले म्हणून त्यांच्या चुकीच्या निर्णयाचे मी कदापि समर्थन करणार नाही. मी जनतेच्या आशीर्वादाने खासदार झालोय. कुण्या नेत्याच्या उपकाराने नाही, असा टोला त्यांनी मोदींचे नाव न घेता मारला.

 

नाना पटोले यांची कारकीर्द
- १९९२ मध्ये सानगडी क्षेत्रातून अपक्ष म्हणून जिल्हा परिषद सदस्यपदी निवडून आले. 
-  काँग्रेसमध्ये प्रवेश करून विधानसभेच्या १९९९ व २००४ अशा दोन निवडणुका त्यांनी जिंकल्या.
- २००८ मध्ये त्यांनी नेतृत्वावर टीका करत काँग्रेसला साेडचिठ्ठी दिली हाेती.
-  २००९ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून लोकसभा लढवली. मात्र, ते निवडून येऊ शकले नाहीत. जुलै २००९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 
-  २००९ मध्ये साकोलीमधून भाजपकडून ते विजयी झाले. पुढे २०१४ मध्ये भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा त्यांनी भंडारा मतदारसंघात पराभव केला होता.

 

मुख्यमंत्र्यांबद्दल

फडणवीस  जवळच्याच व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनात लक्ष देतात. राजकारणात  काेणीही काेणाच्या वैयक्तिक बाबीत लक्ष देऊ नये. त्यांनी या पद्धतीने किमान माझ्या तरी वाटे जाऊ नये. एवढीच माझी त्यांना सूचना आहे. 


पंतप्रधानांबद्दल

माेदींनी स्वामिनाथन अायाेगाचे अाश्वासन दिले हाेते. मात्र ते पाळले नाही. जनतेचा विश्वासघात झाला. अाेबीसी अारक्षण, मंत्रालय, मुलांची शिष्यवृत्ती, या सर्वच गाेष्टींमध्ये मला सरकारमधून प्रचंड विराेध झाला.

 

... मात्र खरे कारण वेगळेच 

दाेन वर्षांपूर्वी भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप पराभूत झाला. तेव्हापासून पटोलेंभोवती भाजपमध्ये असलेले वलय कमी होत गेले. यानंतरच्या काळात पक्षात वजन कमी झाल्याचे शल्य त्यांच्या मनात होते. म्हणूनच त्यांनी खासदारकी सोडली असल्याचे बोलले जाते.

 

> लोकशाहीत अडचणी निर्माण होतात व जनतेत काम करणाऱ्या व्यक्तीला जेव्हा या गोष्टी मान्य नसतात तेव्हा राजीनाम्यासारखे निर्णय घ्यावे लागतात.’

-नाना पटाेले (राजीनाम्यानंतर)

 

मोदींवर नाराजी कशामुळे?

 

मे महिन्यात माेदींनी महाराष्ट्रातील खासदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत नाना पटोले यांनी शेतकरी व ओबीसींचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र मोदींनी हाताने इशारा करत त्यांना खाली बसायला भाग पाडले हाेते.

 

काँग्रेसचा प्रचार

‘मी अजून काेणत्याही पक्षात जाण्याचा विचार केेला नाही. मात्र राहुल गांधींसाेबत गुजरातमध्ये काँग्रेसचा प्रचार करेन,’ असे पटाेले म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...