आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरला वेगळा न्याय! महापौर म्हणाल्या, लोकायुक्ताची गरज नाही, आम्हाला पूर्ण बहुमत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मुंबई महापालिकेत पारदर्शक कारभाराच्या नावावर लोकायुक्तांसाठी आग्रही असलेल्या भाजपने नागपुरात वेगळा न्याय लावण्याचा प्रयत्न केला आहे.  भाजपला पूर्ण बहुमत असल्याने लोकायुक्तांची गरज नसल्याचा तर्क नव्या महापौर नंदा जिचकार यांनी मांडला आहे. 

नागपुरात पारदर्शी कारभारासाठी लोकायुक्तांची नियुक्ती होणार काय? या प्रश्नावर गडबडलेल्या नव्या महापौरांनी भाजपला संपूर्ण बहुमत असल्याचा तर्क मांडला. नागपुरात पारदर्शक कारभार करू, अशी हमीही त्यांनी दिली. सर्व विरोधी पक्षांना विश्वासात घेऊनच नागपूरचा विकास करू, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. दरम्यान, रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत  नंदा जिचकार यांनी ८२ मतांनी काँग्रेसच्या नेहा निकोसे यांचा पराभव केला तर उपमहापौर पार्डीकर यांनी ८० मतांचे आधिक्य राखून काँग्रेसचे नितीश ग्वालबंशी यांना पराभूत केले. 

महापालिका निवडणुकीत १०८ जागा मिळवून भाजपने यंदा प्रथमच बहुमत मिळवले आहे. नागपूरच्या मतदारांनी दिलेला कौल पाहता त्याला वावच नसल्याने भाजपसाठी ही निवडणूक केवळ औपचारिकता असल्याचे चित्र  दिसत होते.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...