आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nanded Become Solar City; University Also Form Syllabus D.P.Sawant

नांदेड होणार सोलार सिटी; विद्यापीठांतही अभ्यासकम- डी. पी. सावंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील पहिले सोलार शहर म्हणून नांदेड विकसित करण्याचा मानस आहे. तसेच विद्यापीठांमध्ये या विषयाचा अभ्यासक्रम शिकवण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे, अशी माहिती अपारंपरिक ऊर्जा मंत्री डी. पी. सावंत यांनी दिली.

नांदेडचा प्रसिद्ध गुरुद्वारा, सरकारी कार्यालये, महाविद्यालये आणि महत्वाच्या वसाहती सौर ऊज्रेने उजळवण्याची योजना आहे. यासाठी नांदेड मनपाला योजना तयार करण्यास सांगितले असल्याचे ते म्हणाले.

सौर ऊज्रेचा वापर वाढल्यास विजेची मागणी कमी होऊ शकते. केंद्राने यासाठीच जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर ऊर्जा मिशन सुरू केले आहे. या योजनेअंतर्गत सरकारी कार्यालयांत सौरउर्जेसाठी 50 टक्के तर खासगी संस्थांना 25 टक्के निधी मिळतो. आपले राजभवन याच योजनेअंतर्गत सौर ऊज्रेने उजळून निघालेले आहे. आता ही योजना आम्ही संपूर्ण राज्यात राबवणार असल्याचे सावंत म्हणाले. याकामी कुशल मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीला आम्ही अभ्यासक्रम तयार करण्यास सांगितले होते. पुणे आणि नांदेड विद्यापीठात हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक विभागात स्वतंत्र लॅब उभारण्याचीही योजना असल्याचे सावंत म्हणाले.