आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
मुंबई - नांदेड, जालना, पूर्णा आणि परभणी येथे झालेल्या बॉम्बस्फोटांचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात आला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गृह विभागाने मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर हा तपास एटीएसकडून एनआयएकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती गृह विभागातील सूत्रांनी दिली.
एप्रिल 2006 मध्ये नांदेड येथे एका घरात बॉम्ब बनवताना त्याचा स्फोट झाला होता. या स्फोटाचा तपास सुरू झाला असता अगोदरच्या तीन बॉम्बस्फोटांचे धागेदोरे हाती लागले होते. नोव्हेंबर 2003 मध्ये परभणीमधील मोहंमदिया मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. त्यानंतर ऑगस्ट 2004 मध्येही पूर्णा तसेच जालना येथील कादरिया मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात हिंदुत्ववादी संघटनेचा हात असल्याचे तपासात आढळून आले होते. त्यानंतर याचा तपास एटीएसने सुरू केला होता. 2008 मध्ये वाशी येथील विष्णुदास भावे सभागृह आणि ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्येही बॉम्बस्फोट करण्यात आला होता. यामध्ये अभिनव भारत संघटनेचा हात असल्याचे तपासात आढळले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.