आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नॅनो कार आता येणार इलेक्ट्रिक रूपात; उत्पादनासाठी जयेम अाॅटाेमाेटिव्ह कंपनीचा टाटाशी करार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सर्वसामान्यांना चारचाकीतून फिरण्याचा अानंद लुटता यावा असे स्वप्न बघणाऱ्या प्रसिद्ध उद्याेगपती रतन टाटा यांनी  ‘टाटा नॅनाे’च्या रूपाने जगातील सर्वात स्वस्त माेटार बाजारात अाणली. अाता वाहन बाजारातील बदलता कल लक्षात घेऊन टाटा नॅनाे नव्या इलेक्ट्रिक अवतारात बाजारात येणार अाहे. या माेटारीचे ८ नाेव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते अनावरण हाेण्याची शक्यता अाहे.   


केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी २०३० सालापर्यंत देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर १०० टक्क्यांवर नेण्याची घोषणा केली असताना अनेक वाहन कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहन बाजारात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. टाटा माेटर्सने पुढाकार घेत नॅनाे इलेक्ट्रिक माेटारीच्या रूपात बाजारात दाखल करण्याची तयारी पूर्ण केली अाहे. या इलेक्ट्रिक माेटारीच्या उत्पादनासाठी जयेम अाॅटाेमाेटिव्ह या कंपनीने टाटाशी करार केला अाहे.  पहिल्यांदा अाेला कंपनीच्या दिल्लीतील टॅक्सी ताफ्यात या माेटारीचा समावेश करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.  या माेटारीचे संपूर्ण उत्पादन अाणि वितरण जयेएम अाॅटाेमाेटिव्ह कंपनी करणार असल्याने ही इलेक्ट्रिक माेटार ‘जयेएम निअाे’ या नावाने अाेळखली जाणार असल्याची चर्चा अाहे.  

 

इलेक्ट्रिक निअाेची वैशिष्ट्ये  
- चार अासने, वातानुकूलित  
- सध्याच्या नॅनाे माेटारीचे वजन ६३६ किलाेग्रॅम अाहे, तर नवीन इलेक्ट्रिक नॅनाेचे वजन ८०० किलाेग्रॅम असेल  
- पूर्णपणे इलेक्ट्रिक चार्ज केल्यानंतर २०० किलाेमीटरचे अंतर धावेल. एसीत चार व्यक्ती प्रवास करत असतील तर पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार १५० किलाेमीटरपर्यंत जाऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...