आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narayan Rane Attack On Congress Leader After Bandra Defeat

पराभवाला काँग्रेस नेतेच जबाबदार- नारायण राणेंचे स्वपक्षीयांवर \'प्रहार\' सुरु

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नारायण राणेंसारखा आक्रमक व खंदा आमदार विधानसभेत जाऊ नये हे जसे भाजप-शिवसेनेला वाटत होते तसेच काँग्रेसमधील काही मंडळींना वाटत होते. काँग्रेस पक्षाचे अनेक नेते केवळ चेहरा दाखवण्यापुरते समोर होते. काही दाखवण्यापुरतेही नव्हते. जे समोर होते ते शरीराने बरोबर होते. आणि मनाने काही वेगळेच योजत होते. त्यामुळे दिसायला काँग्रेस पक्ष प्रचारफेरीच्या जीपमध्ये एकत्र? दिसला तरी व्यवहारात काम करताना किंवा काळोख पडल्यानंतर तो एक नव्हता आणि काळोख पडल्यानंतरही अनेकांनी अनेक उद्योग केले; पण नारायण राणे लढले आणि काँग्रेस पक्ष हरला असा अग्रलेख नारायण राणेंच्या दैनिक प्रहारमध्ये लिहला आहे. दरम्यान, राणेंच्या पराभवासाठी कटकारस्थाने रचणारे स्वपक्षातील ते नेते कोण असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
वांद्रेत काँग्रेसच्या तिकीटवर पोटनिवडणुकीत उभे राहिलेले नारायण राणेंचा तृप्ती सावंत यांनी सुमारे 20 हजार मतांनी पराभव केला. या पराभवानंतर नारायण राणेंच्या 'दैनिक प्रहार'च्या अग्रलेखातून या पराभवाचे विश्लेषण करण्यात आले आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, ज्या मतदारसंघात आमदाराच्या निधनामुळे निवडणूक होते, त्या मतदारसंघात एक सहानुभूतीची भावना असते. वांद्र्यातही तीच भावना होती. या मतदारसंघात काँग्रेसजवळ उमेदवार नव्हता. त्यामुळे दिल्लीपासून पक्षश्रेष्ठींनी या मतदारसंघात नारायण राणे यांनी उभे राहावे, असा आग्रह धरला होता. ज्या मतदारसंघात भावनात्मक विषय असतो, तिथली निवडणूक लढवणे कठीण असते; पण नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या शब्दाखातर निवडणुकीची उमेदवारी मान्य केली. धोके दिसत असताना मान्य केली. त्यांचा तो स्वभाव आहे. त्यानुसार ते निवडणुकीत उतरले. सगळी ताकद पणाला लावून ते लढले. ज्या मतदारसंघात काँग्रेसची अनामत रक्कम गेली होती, त्या मतदारसंघात राणे यांनी काँग्रेसला 33 हजार 703 मते मिळवून दिली. ‘एमआयएम’ची अनामत रक्कम जप्त झाली. पराभव झाला असला तरी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात नारायण राणे लढले आणि ‘बचेंगे तो और भी लडेंगे..’ या दत्ताजी शिंदे यांच्या लढाऊ बाण्याने त्यांनी ही निवडणूक लढवली. निवडणुकीत जय आणि पराजय होत असतात, त्या पराभवाने खचून जायचे नसते. नारायण राणे हे त्यातले व्यक्तिमत्त्व नाही. त्यामुळे सिंधुदुर्गातील पराभवानंतरही काँग्रेसच्या शब्दासाठी त्यांनी या मतदारसंघात उभे राहण्याचे धाडस केले. त्यांच्या धाडसाचेच मोठे कौतुक आहे. त्यामुळे या निवडणुकीत ‘राणे लढले आणि काँग्रेस हरली’ असेच या निवडणुकीचे विश्लेषण करावे लागेल असे अग्रलेखात म्हटले आहे.
पुढे वाचा, नारायण राणे संपणार नाहीत, प्रहारमधून वल्गना...