आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narayan Rane Attack On Sanathan, Bjp, Rss Over Sabnis Issue

...तर लोक कायदा हातात घेतील, सनातन RSS चे पिल्लू- नारायण राणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नारायण राणे (फाईल फोटो) - Divya Marathi
नारायण राणे (फाईल फोटो)
मुंबई- पिंपरी-चिंचवड येथे होणा-या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना टि्वटरवरून सनातन संस्थेचे कायदेशीर सल्लागार संजीव पुनाळेकर यांनी धमकी दिल्यानंतर हे प्रकरण तापत चालले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी सिंधूदुर्ग येथे बोलताना सनातन संस्थेवर हल्लाबोल करीत भाजप सरकार व आरएसएसला जबाबदार धरले. सनातनला आर्थिक मदत सरकारमधीलच काही लोक करीत आहे. सनातन हे भाजप सरकार व आरएसएसचे पिल्लू आहे. हे असेच होत राहिले आणि अशा प्रवृत्ती वाढत गेल्या तर एक दिवस लोक कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाहीत. महाराष्ट्रात सनातनची एकही संस्था, शाखा शिल्लक राहणार नाही असा इशारा राणेंनी दिला.
काय म्हणाले नारायण राणे?
- दाभोळकर, पानसरे यांच्या हत्येनंतर श्रीपाल सबनीस यांना धमकी मिळत असेल आणि काही बरे-वाईट झाले तर लोकच आता कायदा हातात घेतील. अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचावे लागेल.
- सनातनचे लोक मॉर्निंग वॉकला जात नाहीत काय? सनातन ही संस्था भाजप व आरएसएसचे पिल्लू आहे.
- सनातनची मस्ती अशीच राहिली तर महाराष्ट्रात एकही संस्था राहणार नाही.
- नारायण राणेंचे चिरंजीव व काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी कालच सबनीस यांची पुण्यात भेट घेतली.
- सबनीस भाषणात काहीही चुकीचे बोलले नाहीत, ते त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. साहित्य संमेलनाच्‍या अध्‍यक्षांना अशा प्रकारची धमकी मिळणे ही चिंतेची बाब आहे. विचारांची लढाई आता गोळ्यांनी खेळली जात आहे. आम्‍हीही त्याच भाषेत उत्‍तर देऊ असे नितेश राणेंनी सांगत सबनीसांना पाठिंबा दिला.
काय आहे प्रकरण?
- पिंपरी-चिंचवड येथे होणा-या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना टि्वटरवरून सनातनच्या संजीव पुनाळेकरांची धमकी
- श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली होती.
- मोदी कलंकित पंतप्रधान आहेत व ते माझ्या लायकीचे पंतप्रधान नाहीत असे वक्तव्य करून त्यांचा एकेरी उल्लेख केला होता.
- श्रीपाल सबनीस तुम्ही पण मॉर्निंग वॉकला जात चला अशा आशयाचे पुनाळेकरांचे टि्वट
- भाजपने श्रीपाल सबनीस यांना जोरदार विरोध सुरु केला आहे. भाजपचे खासदार अमर साबळे यांनी सबनीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढून निषेध केला व संमेलनस्थळी पुतळ्याचे दहन केले.
- श्रीपाल सबनीस यांनी माफी मागितली नाही तर संमेलन उधळून लावू असा इशारा साबळे यांनी दिला आहे.
पुढे आणखी वाचा...