आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण राणेंचा शिवसेनेला आवाज; पोटनिवडणुकीत उभे राहणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वैभव नाईकांच्या हातून झालेला पराभव माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या जिव्हारी लागला आहे. मुख्य म्हणजे या पराभवाने आपण राज्याच्या राजकारणात बाहेर फेकले गेल्याची अस्वस्थता सहन होत नसल्याने त्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीला उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. वांद्रे येथील
पोटनिवडणुकीला उभे राहण्यासाठी काँग्रेसकडून त्यांना हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्यांनीही आपण शिवसेनेला आवाज देण्यासाठी तयार आहोत, अशी गर्जना केली.

शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांचे निधन झाल्याने वांद्रे येथे ११ एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. वांद्रे हा शिवसेनेचा गड असून ठाकरे परिवारासाठी ही नेहमीच प्रतिष्ठेची निवडणूक ठरली आहे. बाळा सावंत यांचे निधन झाल्याने पुन्हा एकदा येथील जनतेला निवडणुकीला सामोरे जावे लागणार असून या ठिकाणी बाळा सावंत यांच्या पत्नीला उमेदवारी
दिली जाईल. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे निधन झाल्याने तासगावमध्येही पोटिनवडणूक होत असून या ठिकाणी मात्र काँग्रेसने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. तासगावमध्ये आबांच्या स्मृतींना अभिवादन करताना काँग्रेसने निवडणुकीला न उभे राहण्याचा निर्णय घेतला असला तरी तोच निकष त्यांनी वांद्र्याच्या निवडणुकीत पाळलेला
नाही.

पुढे वाचा.. 'मी तयार आहे' : राणे