आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी सर्वात मोठा थापाड्या, काँग्रेस ‘व्हिजन’मध्ये राणेंची सडकून टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्‍ट्र प्रदेश काँग्रेसने मुंबईत बुधवारी आयोजित केलेल्या ‘व्हिजन 2014’ मध्ये काँग्रेस नेते गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरच घसरले. मोदींच्या कथित विकासकामांची त्यांनी जोरदार हजेरी घेतली. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी तर मोदींचा थापाड्या असा उल्लेख केला.

बुधवारी दुपारी षण्मुखानंद सभागृहात सुरू झालेल्या शिबिराची सांगता सायंकाळी झाली. पाच तास चाललेल्या या शिबिरात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे-पाटील, शिवाजी देशमुख, राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासह खासदार-आमदारांची मोठी उपस्थिती होती.

मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण, मोहन प्रकाश, भालचंद्र मुणगेकर काय म्‍हणाले... हे वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...