आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराची कुंडली जनतेसमोर मांडणार- नारायण राणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नारायण राणे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना.. - Divya Marathi
नारायण राणे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना..
सिंधूदुर्ग- ‘अच्छे दिन’चे व महागाई कमी करण्याचे स्वप्न दाखवून भाजपा-शिवसेनेने जनतेची फसवणूक केली. मात्र, भाजप सरकारमधील भ्रष्टाचाराने माखलेल्या नेत्यांचे 'बुरे दिन' आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. लवकरच राज्यात दौरा करून सत्ताधा-यांच्या भ्रष्टाचाराची कुंडली जनतेसमोर मांडणार आहे असा इशारा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. शिवसेनेने गेल्या 22 वर्षात मुंबई शहर बकाल केले आहे आणि आता तेच राज्यात एक हाती सत्ता देण्याची मागणी करत आहेत. शिवसेना-भाजपा रोज भांडताहेत, एकमेकांवर रोज लाथा मारण्यापेक्षा राजकीय घटस्फोट घ्या, असे आव्हानही राणेंनी उद्धव ठाकरेंना दिले.
महाराष्ट्र काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारने व राज्यातील युती सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. जनतेचे विशेषत शेतक-यांबाबत या दोन्ही सरकारनेही कोणतेही ठोस उपाययोजना केल्या नाहीत. या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसने गुरुवारी सर्व जिल्ह्यात मोर्चा, आंदोलन केले. सिंधूदुर्ग जिल्ह्यातही मोर्चा काढण्यात आला. ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिराकडून थेट जिल्हाधिकारी भवनावर हा मोर्चा गेला. त्यानंतर नारायण राणे यांच्यासह अन्य पदाधिका-यांनी मार्गदर्शन केले.

राणे म्हणाले, सिंधुदुर्गचा विकास थांबवण्यासाठी भाजपाचे मंत्री केंद्रात कटकारस्थाने करत आहेत. गोव्यातील मंत्री अधिकच सक्रिय आहेत. चिपी विमानतळाची धावपट्टी मी गोव्याच्या विमानतळापेक्षा मोठी मंजूर करून घेतल्याने त्यांना हा विमानतळ नको आहे. यापुढे कोकणावर अन्याय सहन केला जाणार नाही. येत्या ऑक्टोबर -नोव्हेंबरपर्यंत चिपी विमानतळावरून विमानाचे उड्डाण न झाल्यास एकाही मंत्र्याचे हेलिकॉप्टरचे जिल्ह्यात उतरू देणार नाही, असा इशारा राणेंनी दिला.
ते पुढे म्हणाले, कोकणी जनतेवर होणा-या अन्यायावर कोकणातील मंत्री काहीच बोलत नाहीत. सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांना काहीच कळत नाही. सी-वर्ल्ड, चिपी विमानतळ ही महत्त्वाची कामे थांबली. सरकारी योजनांचा लाभ जनतेला मिळत नाही, शेतकरी हवालदिल झाला आहे. येथील जनतेला रेशन धान्य दुकानावर रेशन नाही. घरात पैसा आणि अन्न नसल्याने भुकबळी जावू लागले. गेली 15 वर्ष सत्तेपासून दूर असल्याने सरकारमधील सगळेच मंत्री सत्तेवर तुटून पडलेले आहेत. विद्यमान मुख्यमंत्री फार बालिश आहेत. कोठे झोपावे आणि कोठे काय करावे याचेही त्यांना भान नाही. एमआयडीसीच्या पैशातून मुख्यमंत्री पत्नीसमवेत परदेश दौरे करतात. त्यांनी मुख्यमंत्री पदाची शान घालविलेली आहे. मात्र, मुख्यमंत्री परदेश दौरे करत आहेत. भाजपातील एक तरी मंत्री दाखवा जो भ्रष्टाचारापासून मुक्त आहे, असे आव्हान राणे यांनी दिले.
पुढे वाचा व पाहा... सजविलेल्या बैलगाडीवर आरुढ होत नारायण राणे काढला मोर्चा...
बातम्या आणखी आहेत...