आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना मला घाबरली, अनिल देसाई हे उद्धव ठाकरेंचे कारकून - नारायण राणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वांद्रे (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेण्याबाबत निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली. मात्र, मतदानासाठी केवळ काही तास राहिल्यामुळे पत्रकार परिषद घेऊ नये असे बजावल्यानंतरही राणेंनी पत्रकार परिषद घेतली. वांद्रे पोटनिवडणुकीसाठी उद्या ( शनिवारी) मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर राणेंनी आचारसंहितेचा भंग केल्याचे बोलले जात आहे. निवडणूक आयोग याबाबत काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
निवडणूक आयोग कोणत्या कारणास्तव व कोणत्या नियमानुसार पत्रकार परिषद घेण्यास नकार देते ते सांगावे म्हणत राणेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी राणेंनी शिवसेनेवर टीका केली. माझा विजय दृष्टीपतात दिसत असल्याने शिवसेनेच्या नेत्यांच्या पायखालची वाळू घसरली आहे. माझ्यामुळे शिवसेना घाबरली असून, आताची शिवसेना ही पूर्वीसारखी आक्रमक शिवसेना राहिली नाही असे राणेंनी सांगितले. वांद्रेत माझा विजय निश्चित असल्याचेही राणेंनी सांगितले.
खासदार अनिल देसाई हे तर उद्धव ठाकरेंचे कारकून आहेत अशी टीकाही राणेंनी यावेळी केली.