आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता नारायण राणेंचा 8 डिसेंबरपासून पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या यांच्यानंतर आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नारायण राणे पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. राणे हे 3 दिवस पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 8, 9, 10 डिसेंबर असा हा तीन दिवसांचा दौरा असेल.

 

कुठे देणार भेट?

सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना राणे भेट देणार आहेत. नवीन पक्षाची स्थापना  केल्यानंतर राणेंना विधानपरिषदेची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. पण ती फोल ठरली. त्यामुळे सध्या राणे नवनिर्वाचित पक्षाच्या सक्षम उभारणीचा प्रयत्न करत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...