आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narayan Rane May Not Contest Upcoming Assembly Election

निवडणूक न लढविण्याचा मी विचार करतोय, नितेशला तिकीट द्या- नारायण राणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल फोटो- नारायण राणे)
मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीत मी निवडणूक न लढविण्याचा विचार करीत आहे. माझ्याऐवजी माझा मुलगा नितेशला कुडाळमधून तिकीट द्यावे असे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे.
नारायण राणे यांनी काल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, चव्हाण यांनी तो अद्याप स्वीकारलेला नाही. तसेच राजीनाम्याचा फेरविचार करावा असे म्हटले आहे. आज सकाळी राणे, मुख्यमंत्री चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात दोन तास चर्चा झाली. मात्र यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे हे त्रिकुट येत्या दोन दिवसात पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची वेळ घेऊन भेट घेणार आहेत. त्यानंतर आपण पुढील निर्णय घेऊ असेही राणे यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्यासोबतची बैठक निष्फळ ठरल्यानंतर राणेंनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, काँग्रेसमध्ये किंवा इतर कोणीही माझी घुसमट करू शकत नाही. मात्र, आगामी विधानसभा निवडणुक मी लढू नये असेच मला वाटत आहे. तसा विचारही मी करीत आहे. कोकणातील कुडाळ विधानसभा मतदारसंघातून माझा मुलगा नितेशला विधानसभेचे तिकीट द्यावे असे सांगत राणेंनी आपल्या इच्छेला वाट मोकळी करून दिली. कोकणात मोठी विकासकामे करूनही लोकांनी लोकसभा निवडणुकीत निलेश राणेंना पराभूत केले अशी खंत राणेंनी बोलून दाखविली.
दरम्यान, राणेंमागे कोकणातील जनता आता राहिलेली नाही. राणे ज्या मतदारसंघातून आमदार आहेत तेथूनही ते निवडून येणार नाहीत अशी कोकणात चर्चा आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनीही हाच प्रचार सुरू केला आहे. राणेंनी केसरकरांना आपल्याविरोधात निवडणुक लढविण्याची आव्हान दिले होते. तेही केसरकरांनी स्वीकारले आहे. एकूनच राणेंना आपण आपल्या मतदारसंघातून तरी निवडून येऊ की नाही याची खात्री राहिलेली नाही. त्यामुळे ते स्वत: उभे न राहता मुलगा नितेशला पुढे करीत आहेत.
दुसरीकडे अशीही चर्चा आहे की, काँग्रेसचे सरकार येणार नाही याची राणेंना 100 टक्के खात्री आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील आमदार बनण्यापेक्षा मुलगा नितेशला निवडणुकीच्या राजकारणात उतरावावे. जेणेकरून आगामी काळात विधानसभेत नितेश व लोकसभेसाठी निलेशची दावेदारी भक्कम राहावी असा राणेंचा प्रयत्न असल्याची चर्चा कोकणात सध्या आहे. राणेंच्या मागे कोकणातील जनता आता जाणार नाही. केसरकर व शिवसेनेने लोकांना आकर्षित करण्यास सुरूवात केल्याचे चार दिवसापूर्वी कोकणात राणेंच्या झालेल्या मेळाव्यात दिसून आले आहे. या मेळाव्यात स्थानिक नेते व कार्यकर्ते कमी व बाहेरून स्वाभिमानीचे आलेले कार्यकर्ते जास्त होते अशी माहिती पुढे आली आहे. एकूनच सर्व अंदाज घेऊन राणे निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर होण्याची शक्यता व्यक्त होते. तसेच राणेंनी आज स्पष्ट संकेत दिले आहेत.