आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे - नारायण राणेंची भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण दौर्‍यादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमधील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान राणे यांचे आमदार पुत्र नितेश राणे हेदेखील उपस्थित होते. राज-राणे भेटीमुळे राजकीय वर्तुळात नव्याने चर्चेला उधाण आले आहे.

आपल्या दहा दिवसांच्या कोकण दौर्‍यावर असलेल्या राज ठाकरे यांनी बुधवारी संध्याकाळी नारायण राणेंच्या कणकवली येथील ओम गणेश या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. ही संपूर्णत: सदिच्छा भेट होती. दहा मिनिटे झालेल्या या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले आहे.