आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण राणे दिल्लीला रवाना; भाजपच्या कार्यकारिणीची बैठकीनंतर घेणार अमित शहा यांची भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काँग्रेसला साेडचिठ्ठी दिलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे साेमवारी दिल्लीत जाऊन भाजपचे अध्यक्ष   अमित शहा यांना भेटणार असल्याची चर्चा अाहे. दिल्लीत सध्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू अाहे. ही बैठक अाटाेपल्यानंतर राणे शहांना भेटून सिंधुदुर्गमध्ये उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या उद्घाटनाचे निमंत्रण देणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर अापण राज्यव्यापी दाैरा करणार असून दसऱ्यापूर्वी नवा निर्णय जाहीर करू. या दाैऱ्याची सुरुवात नागपूरपासून करू, असे राणेंनी स्वत:च घटस्थापनेच्या दिवशी सांगितले हाेते. मात्र चार दिवस उलटले तरी अद्याप राणेंच्या दाैऱ्याला सुरुवात झालेली नाही. दरम्यान, नागपूरमधील राणे समर्थकांकडूनही राणेंच्या संभाव्य दाैऱ्याबाबत कुठलीही माहिती नसल्याचे सांगण्यात येत अाहे. त्यामुळे राणेंच्या पुढील भूमिकेबाबत अजूनही ‘सस्पेंस’ कायम  अाहे. दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीसाठी दिल्लीत गेलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राणेंबाबत शहांशी चर्चा करणार असल्याचेही राणेंच्या समर्थकांकडून सांगण्यात येते.
 
भाजप प्रवेशाबाबत अनिश्चितता कायम
नारायण राणे यांनी नुकताच काँग्रेसला रामराम केला आहे. त्यामुळे ते एकतर नवीन पक्षाची स्थापना करतील किंवा भाजपमध्ये जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह आणि नारायण राणे यांच्या भेटीने आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना बळ मिळाले आहे. नारायण राणे यांनी विधानपरिषद आमदारकीचा आणि काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. कुडाळमधील पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले मात्र कधीच पाळले नाही. 26 जुलै 2005 रोजी मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण या 12 वर्षात माझ्या कामाचा, अनुभवाचा फायदा करुन घेतला नाही, असा आरोपही राणेंनी केला.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...