आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण राणेंनी सभा गुंडाळल्या, केसरकरांच्या सुरक्षेत वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कोकणातील दहशत संपवण्यासाठी राष्ट्रवादीचे बंडखोर नेते दीपक केसरकर यांनी उद्योगमंत्री नारायण राणेंना दिलेल्या आव्हानामुळे काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राणेंनी मंगळवारी रत्नागिरीतील सभा रद्द करून सावंतवाडी, कुडाळमध्ये वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न मारले. दरम्यान, काँग्रेसविरुद्ध राष्ट्रवादीत यांच्यात निर्माण झालेला तणाव पाहता केसरकरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

नरकासुराचा वध केल्याशिवाय सिंधुदुर्गात लक्ष्मी येणार नाही, अशी टीका केसरकरांनी सोमवारी केली. त्याआधी त्यांनी आमदारकीचा राजीनामा शरद पवार यांच्याकडे दिला होता. राणेंवरील टीकेनंतर सोमवारीच त्यांनी सावंतवाडीत राष्ट्रवादीच्या निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेत थेट शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता.

या निर्णयामुळे सिंधुदुर्गात काँग्रेसेचे उमदेवार नीलेश राणेंना मोठा फटका बसणार, असे चित्र दिसत असल्याने मंगळवारी घाई गडबडीने आपल्या जिल्ह्यात दोन सभा घेऊन राणेंनी केसरकरांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.

सामंतांचा बार फुसका
सिंधुदुर्गातील अख्खी राष्ट्रवादी केसरकर यांच्या मागे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे रत्नागिरीतील मंत्री उदय सामंत राणेंना सावरण्यासाठी सिंधुदुर्गमध्ये धावले. मात्र त्यांच्या सभेला अतिशय अल्प प्रतिसाद होता. सामंतांचाही बार फुसका निघाल्यामुळे राणेंच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.