आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी आणि शिक्षणात मराठय़ांना आरक्षण; राणेंचा अहवाल उद्या विधिमंडळात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठा आरक्षणाचा मुद्दा अंतिम टप्प्यात आला असून, या समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळणार आहे. समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आपला अहवाल बुधवारी राज्य सरकारला सादर केला आहे. राज्य सरकार शुक्रवारी याबाबत आपली भूमिका मांडणार असून, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आरक्षण लागू होईल, असे सूत्रांनी म्हटले आहे. आरक्षणाच्या बाजूने हा अहवाल असून, आरक्षण कसे द्यावे यावर आम्ही अभ्यास केला आहे. याबाबत एक सर्वेक्षणही पूर्ण केले असून, अहवाल मंत्रिमंडळापुढे मांडला आहे, असे नारायण राणे यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा या आरक्षणाला फटका बसेल का यावर पुढे काय होईल ते पाहू, सध्या तरी आम्ही आरक्षणासाठी कटिबद्ध आहोत, असे राणे म्हणाले.