आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narayan Rane News In Marathi, Congress, Divya Marathi

राणेंना पक्षातूनच आव्हान; विखे पाटील, थोरातांचा मार्ग मोकळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काँग्रेसचे दिग्गज नेते तथा प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणेंना कोकणात पक्षातूनच आव्हान देण्यात येत आहे, तर उत्तर महाराष्ट्रातील नेते राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात आणि पद्माकर वळवी यांच्या मतदारसंघात मात्र अन्य एकही इच्छुक उमेदवार नसल्याने त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे, असे चित्र बुधवारी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींच्या शेवटच्या दिवशी पाहायला मिळाले.
इच्छुकांच्या मुलाखतींच्या शेवटच्या दिवशी उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईमधील एकूण ७२ मतदारसंघांसाठी मुलाखती पार पडल्या.अहमदनगर जिल्ह्यातील कृषमिंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शरि्डी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तसेच क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांच्या नंदुरबारमधील शहादा मतदारसंघातून मंत्रि महोदयांव्यतिरिक्त एकाही इच्छुकाचा अर्ज न आल्याने तिघांची उमेदवारी नशि्चित झाली आहे, तर अहमदनगर शहर मतदारसंघातून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे असलेले युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.

महसूलमंत्री राणेंच्या कुडाळ मतदारसंघातून नुकतेच राष्ट्रवादीतून आलेले कणकवलीचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी अर्ज दाखल केला आहे, तर राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी कणकवली मतदारसंघातून इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला असून त्यांच्या समोर विधान परिषदेचे आमदार व राणेंचे कट्टर विरोधक वजिय सावंत यांनीही इच्छुक म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे कोकणात राणेंसमोर पक्षांतर्गत आव्हान उभे राहिले आहे.

महिलांचा प्रतिसाद तुरळक
प्रत्येक जिल्ह्यात कमिान एका तरी महिलेला उमेदवारी मिळावी अन्यथा पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार करू अशी आग्रही मागणी प्रदेश काँग्रेसच्या महिला अध्यक्ष कमल व्यवहारे यांनी मुलाखतींच्या पहिल्या दिवशी केली होती. मात्र त्या तुलनेत काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये महिलांची संख्या मात्र कमी होती. मुलाखतींच्या तीनही दविसांत काँग्रेस मुख्यालयात महिलांची तुरळक उपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती.