आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narayan Rane News In Marathi, Congress, Narendra Modi, Divya Marathi

काँग्रेसच्या पंतप्रधानांनी रक्त सांडले, नरेंद मोदींचे देशासाठी योगदान काय?, राणेंचा सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘लोकसभा निवडणुकीच्या आधी महागाई कमी करण्याची स्वप्ने दाखवून नरेंद्र मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. काँग्रेसने ६० वर्षांत काय केले असे मोदी विचारतात, पण ते आज ज्या प्रकल्पांची उद्घाटने करताहेत त्या प्रकल्पाचे काम काँग्रेसच्या काळात सुरू झाले आहेत, हे मोदींनी लक्षात घ्यावे,’ असे प्रत्त्युत्तर राज्याचे उद्योगमंत्री व काँग्रेसचे प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी भाजपला दिले.
‘इंग्रजांना हटवले, आता महागाई हटवणार’ असे सांगणाऱ्या मोदी व भाजपचे देशासाठी काय योगदान आहे? त्या उलट देशाची एकात्मता टिकवण्यासाठी काँग्रेसच्या दोन पंतप्रधानांचे रक्त सांडले हा काँग्रेसचा इतिहास आहे, असेही राणेंनी ठणकावून सांगितले.

अखंड महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या १०५ हुतात्म्यांचे स्मरण करून काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात होणार आहे. एक सप्टेंबर राेजी मुंबईच्या हुतात्मा चौकात महाज्योत प्रज्वलित करून प्रचाराचा नारळ फाेडला जाईल, अशी घोषणाही राणेंनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. तत्पूर्वी, शुक्रवारी सकाळी मुंबईतील टिळक भवन येथे नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रसच्या प्रचार समितीची बैठक झाली. यावेळी समितीच्या सदस्यांसह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर घेण्यात अालेल्या पत्रकार परिषदेला राणे, प्रदेशाध्यक्ष मािणकराव ठाकरे यांच्यासह प्रचार समितीचे समन्वयक मुझफ्फर हुसैन, बसवराज पाटील तसेच प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते.

एक सप्टेंबरपासून राज्यात काँग्रेसच्या प्रचाराचा श्रीगणेशा

मुख्यमंत्र्यांचा अवमान सहन करणार नाही
सोलापुरातील हुर्रे प्रकरणाबाबत राणे म्हणाले, नरेंद्र मोदी जरी भाजपचे असले तरी ते आमच्या देशाचे पंतप्रधान आहेत. त्याप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अाम्हाला स्वाभिमान आणि अस्मितेचा आदर्श घालून दलिा, त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान यापुढे सहन करणार नाही, असे राणेंनी ठणकावले.

नीलेशची राष्ट्रवादीवर टीका वैयक्तिक
काँग्रेसने मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली आहेत. त्याआधारेच काँग्रेस पक्ष िनवडणुकीत मते मागेल. वरिोधी पक्षांकडे मात्र सांगण्यासारखे काहीच नाही. लोकसभेत त्यांनी अनेक आश्वासने दलिी होती. परंतु, ती खोटी असल्याचे सिद्ध झाल्याने लोकांचा अपेक्षाभंग झाला असल्याचे राणे म्हणाले. नीलेश राणेंनी राष्ट्रवादीचे मंत्री भास्कर जाधवांवर केलेली टीका हा त्यांचा वैयक्तिक िवषय असल्याचे सांगत राणेंनी या मुद्द्यावर बोलणे टाळले.

सरकारची प्रभावी कामे लोकांपर्यंत पाेहाेचवणार
विधानसभा निवडणुकीसाठी स्थापन झालेल्या काॅंग्रेसच्या माध्यमे व प्रसिद्धी समितीचीही बैठकही दुपारी ३ वाजता गांधी भवनात झाली. या समितीचे अध्यक्ष व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. िनवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस पक्ष व अाघाडी सरकारने केलेली लाेकहिताची कामे प्रभावीपणे जनतेपर्यंत पाेहाेचवण्याचा िनर्णय या बैठकीत घेण्यात अाला.

वेगळ्या िवदर्भाच्या मागणीत गैर काय?
सीमा प्रश्नाबाबत काँग्रेसची काय भूमिका आहे? यावर प्रश्नावर, संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हीच काँग्रेसची भूमिका असल्याचे राणे म्हणाले. मग तुमच्याच राज्य मंित्रमंडळातील सहकारी नितीन राऊत व काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार हे वेगळा विदर्भ व्हावा, असे आंदोलन करत आहेत. याला काय म्हणायचे, असा प्रश्न पत्रकारांनी करताच राणे म्हणाले, ‘वेगळा विदर्भ झाला पाहिजे. तशी मागणी करण्यात काहीच गैर नाही. शिवसेना वगळता सर्वांचाच
त्यास पाठिंबा असून सरकारने त्याबाबतचा निर्णय घ्यावा.’

माणिकरावांचा आवाज दाबला
बेळगाव- कारवार तसेच वेगळा िवदर्भ याबाबतचे प्रश्न खरे तर माणिकराव ठाकरे यांना िवचारण्यात आले होता. मात्र, राणेंनी ‘आज मीच बोलणार, जी काही भूमिका मांडायची ती मी मांडली आहे. मािणकराव यावर बोलणार नाहीत’, असे सांगत प्रदेशाध्यक्षांचा आवाज दाबला.