आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narayan Rane News In Marathi, Industry Minister, Divya Marathi

कुडाळ मतदारसंघातून नारायण राणे लढणार विधानसभा निवडणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आपण यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर करणाऱ्या उद्योगमंत्री नारायण राणेंनी रविवारी घूमजाव करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. तसेच कणकवली मतदारसंघातून आपले पूत्र नितेश यालाही उमेदवारी मिळेल, अशी आशाही व्यक्त केली.

‘आघाडीचे जागावाटप लवकरच मार्गी लागेल. काँग्रेसची पहिली यादी १७ सप्टेंबरला जाहीर होईल,’ अशी माहितीही राणे यांनी कणकवलीत दिली. ‘क्षमता नसल्यानेच उद्धव ठाकरे कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाही,’ अशी टीकाही राणेंनी शिवसेना पक्षप्रमुखांवर केली.

राणे विरुद्ध नाईक, पुन्हा संघर्ष होणार
कट्टर वैरी असलेल्या नारायण राणे विरूद्ध वैभव नाईक यांच्यातच काेकणात पुन्हा संघर्ष होणार हे स्पष्ट झाले आहे. २००९ साली शिवसेनेच्या नाईक यांनी राणेंना चांगलीच लढत दिली होती. यावेळी मात्र मतदारसंघात राणेंच्या विरोधातले वातावरण आणि नाईक यांनी केलेली चांगली तयारी पाहता ही निवडणुक राणेंसाठी सोपी नसेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.