आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षणाबाबत असे काय म्हणाले नारायण राणे की ज्यामुळे उंचावल्या विरोधकांच्या भुवया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आरक्षण व अन्य मागण्यांसाठी हा माझ्या समाजाने काढलेला शेवटचा मोर्चा आहे, असे काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज विधानभवनाच्या सभागृहात सांगितले. इतर समाजाविषयी जसे औदार्य दाखवले तसे मराठा समाजाविषयी दाखवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मराठा आरक्षणाबाबत हे सरकार सकारात्मक दिसतंय, आता त्यांच्याकडून कृतीची अपेक्षा आहे, असा सकारात्मक सूर त्यांनी लावला. त्यामुळे विरोधकांचा भुवया उंचावल्याा होत्या.
 
मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. तुम्ही तज्ज्ञांना बोलावून न्यायालयात जा व मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
बाकीच्या गोष्टी जाहीर केल्यात त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मराठा समाजाच्या तरुण-तरुणीचे प्रश्न सुटावे. त्यांना रोजगार मिळावा. त्यासाठी कौशल्य विकास सारख्या कार्यक्रमांची अत्यंत प्रभावी पध्दतीने अंमलबजावणी करावी, असे ते म्हणाले. मोर्चात येणारे काही लोक हे नकारात्मक विचारानेच येतात. परंतु, मुख्यमंत्र्यांचे उत्तर त्यांची पूर्तता करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
बातम्या आणखी आहेत...