आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत, राजकारणातील नैतिकतेबाबत नारायण राणे म्हणाले...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिवाळीनंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांना स्थान देण्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राणे यांनी यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी दिलेले संकेत खरेच ठरतात मात्र मुख्यमंत्री नेमके काय बोलले ते पाहावे लागेल, असे म्हटले आहे.
 
राजकारणात नैतिकता राहिली नसल्याची खंत
मुंबईत मनसेचे 6 नगरसेवक शिवसेनेत गेले आहेत. यावरून राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात शब्दयुद्ध पेटले आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले की,  त्या दोघांमधील वाद हा त्यांचा घरगुती वाद आहे. मी त्यावर कोणतंही भाष्य करणार नाही. राजकारणात नातं आणि नैतिकता आता शिल्लक राहिलेली नाही, असेही ते पुढे म्हणाले. माझ्या कुठल्याही अपेक्षा नाहीत. मी महाराष्ट्रात सर्व पदे भूषविली आहेत. महत्वाकांक्षा बऱ्याच असल्या तरी मी संतुष्ट आणि समाधानी आहे, असे राणे म्हणाले. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...