आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांती मोर्चा : राजकीय भाषणे होणार नसल्याचे राणेंनी ठणकावले, CM ला देणार निवेदन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी मुख्यमंत्री नारायण राणे. - Divya Marathi
माजी मुख्यमंत्री नारायण राणे.
मुंबई- मराठा मोर्चात राजकीय भाषणं होणार नसल्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्पष्ट केले.  मराठा समाजाचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असून त्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
मोर्चाचा उद्देश
मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय व्हावा, यासाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण हीच मुख्य मागणी असल्याचे सांगतानाच जेवढे मुख्यमंत्री झाले ते मराठा समाजाचेच होते, त्यांनी दुसऱ्या समाजाला आरक्षण देताना सहकार्य केल्याचे त्यांनी नमूद केले. सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी मराठा समाजाच्या मागणीला पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  आरक्षण मिळेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. विधीमंडळात असलेले मराठा समाजाचे नेते याबाबत आवाज उठवतील, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. राणीचा बाग-जे जे मार्गाने-आझाद मैदान असा मार्ग असणार असून त्यानंतर एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना निवेदन देईल, असे त्यांनी सांगितले.  
बातम्या आणखी आहेत...