आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा मोदी सरकारचा डाव- नारायण राणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच गुजराती लोकांचे मुंबईवर लक्ष आहे. महाराष्ट्र व गुजरात राज्याची निर्मिती होत असतानाही मुंबई गुजरातला जोडण्याचा प्रयत्न मुरारजी देसाई यांनी केला होता. पण 105 हुतात्म्यांनी प्राणाची आहुती दिली व मुंबई वाचवली. आता पुन्हा एकदा मुंबई गुजरातला जोडण्याचा नाहीतर केंद्रशासित प्रदेश करण्याचा डाव मोदी सरकारने घातला असल्याचा घाणाघाती आरोप उद्योगमंत्री नारायण राणेंनी केला.
नारायण राणे मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राणे म्हणाले, काही लोकांना मुंबई महाराष्ट्रात आहे व तिची भरभराट होत आहे हे सहन होत नाही. मग अशा स्थितीत मुंबईचे महत्त्व कसे कमी होईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुंबईला केंद्रशासित करण्याचाही काही लोकांचा डाव आहे. मात्र तो आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही.
केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करताना राणे म्हणाले, 1960 च्या दशकात मोरारजी देसाईंनी मुंबईला गुजरातमध्ये जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी 105 हुतात्मे देऊन महाराष्ट्राने मुंबई मिळवली. मराठी माणसांची मुंबईवर मजबूत पकड असल्याचे पाहून काही लोकांनी आता मुंबईचे महत्त्व कमी कसे होईल यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. नरेंद्र मोदींनी नव्या मुंबईतील जेएनपीटी पोर्ट टस्टमधील सागरी मार्गाने होणा-या वाहतूक व व्यापार गुजरातमधील बंदरांकडे वळवायचा प्रयत्न चालवलेला आहे. मुंबईप्रमाणेच रिझर्व्ह बँकेची शाखाही अहमदाबादेत सुरू करायची आहे. मात्र, मराठी अस्मिताचे राजकारण करणा-या शिवसेनेला व उद्धव ठाकरेंना हे कसे काय चालते, अशी टीका राणेंनी केली.